तुम्ही तुमचा बिझनेस खऱ्या अर्थाने समजून घेतलात का?

फेस्टिव्हल सीझन म्हणजे बिझनेस वाढवायची सुवर्णसंधी 💰
पण एक प्रश्न तुमच्यासाठी….
तुम्ही तुमचा बिझनेस खऱ्या अर्थाने समजून घेतलात का?
आपल्यापैकी अनेकांना आपला बिझनेस, आपले Product, सर्व्हिसेस काय आहे हे माहिती असतं, पण आपला ग्राहक??
 
 आपला कस्टमर, आपला ग्राहक काय विचार करतो, काय अनुभवतो हे लक्षात येत नाही. यामुळे आपल्या बिझनेसवर परिणाम होतो.
म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या भाषेत समजून घ्या –
तुमचा व्यवसाय, तुमचा ग्राहक आणि तुमच्या ऑफर…
हो या व्हिडीओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक Free Google Form Template देणार आहे, ज्यामुळे तुम्ही स्वतःसाठी “Business Clarity Sheet” तयार करू शकता.
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 4 गोष्टी समजून घेणार आहोत —
1️⃣ तुम्ही नक्की काय विकता
2️⃣ तुम्ही देऊ केलेली सर्व्हिस, प्रोडक्ट  कोणत्या प्रकारचे आहे
3️⃣ तुमचा ग्राहक कोण आहे
4️⃣ आणि नाकारता येणार नाही अशी ऑफर कशी बनवायची 💥

1. तुम्ही नक्की काय विकता?

हे ऐकायला साधं वाटतं, पण बहुतांश लोक इथेच गोंधळतात.
🔹 Product – उदा. तुम्ही होम अप्लायन्सेस, बेकरी आयटम, कपडे, किंवा होम डेकोर विकता.
म्हणजे ग्राहकाला काहीतरी हातात घेता येणारं आहे असं विकत आहात .
🔹 Service – उदा. Salon, Coaching, Photography, Interior Design, teaching course.
इथे तुम्ही कौशल्य, Skills विकताय — वस्तू नाही.
🔹 Produc आणि Service दोन्ही विकताय म्हणजे  Hybrid Model मध्ये काम करत आहात.
उदा. Cake Baker जो Baking Course सुद्धा विकतो शिवाय Customized Cake बनवून विकतो. Produc आणि Service दोन्ही देतो.
किंवा Fitness Coach जो Online Classes सुद्धा घेतो शिवाय तो Diet Kit सुद्धा देतो.
म्हणून लक्षात घ्या—
मी Product विकतो का, Service की Hybrid Model ? काम करतो….. हा माईन्ट सेट crystal clear झाला की पुढचं काम सोपं होईल.

तुम्ही देऊ केलेली सर्व्हिस, प्रोडक्ट  कोणत्या प्रकारचे आहे?

आता विचार करा —
तुम्ही ग्राहकाला कशा प्रकारे मदत करता? लक्षात घ्या कोणताही ग्राहक हा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमच्याकडे येतो. म्हणून तुम्हाला हे माहिती असावं की तुम्ही देऊ केलेली सर्व्हिस, प्रोडक्ट  कोणत्या प्रकारचे आहे
🔹 Do It Yourself (DIY) –  म्हणजे तुम्ही मार्गदर्शन किंवा टूल्स देतात. आणि त्याच्या मदतीने ग्राहक स्वतः काम करतो.
उदा. जसं केक बनवायला शिका असा कोर्स शिकवणारे ट्रेनर. या ठिकाणी लोक स्किल शिकतात आणि आता त्या स्किलच्या मदतीने स्वतः केक करून विकत आहेत.
दुसरं उदाहरण – Gardening कसं करायचं हे शिकवणारे लोक. या विषयातले तज्ञ लोक बी-बियाणं आणि सूचना तुम्ही देता…. पण झाडं वाढवायची जबाबदारी ग्राहकाची असते.
🔹 One-to-One Service – जिथे तुम्ही थेट त्या ग्राहकासाठी काम करता.
उदा. Salon Expert जो ग्राहकासाठी Styling करतो. गाडी रिपिअर करणारे मेकनिक, इव्हेन्ट ऑरगनायझर
किंवा डॉक्टर मंडळी जे, रूग्णाच्या आजाराचं निदान आणि उपचार करतात.
  इथे तुम्ही देऊ केलेले प्रोडक्ट/सर्व्हिस Personalized असतात. जेव्हा तुम्ही या प्रकारत काम करता तेव्हा तुम्ही तुमचा वेळ देता, कौशल्य देतात आणि त्यासाठी चार्जेस घेतात.
🔹 One-to-Many Offer – जिथे तुम्ही एकाच वेळी अनेकांना सेवा देता.
उदा. कोणी डान्स शिकवण्याचं Online Course विकत असतील,
कोणी शेतकऱ्यांसाठी Training Workshop घेत असतील, कोणी वास्तुशात्र  शिकविण्याचे कोर्सेस एकदा तयार केले आणि तुम्ही तो शेकडो लोकांना विकत आहात!
 
आता तमच्या लक्षात येईल—
मी DIY, One-to-One, की One-to-Many मध्ये काम करतोय
एकदा का हे लक्षात आलं की तुमची Pricing आणि Marketing दोन्ही अधिक Powerful बनतं.

services 02

Who is it for? “माझा ग्राहक कोण आहे?”

सगळ्यांनाच विकायचा प्रयत्न केला तर… कुणालाच विकता येत नाही! 😅
म्हणून अगदी नीट समजून घ्या — माझा आदर्श ग्राहक कोण आहे?
🔹 Retail Business विचार केला तर –  यांचे ग्राहक कोण आहे तर ……त्या भागातले स्थानिक ग्राहक. लोकल कस्टमर, जे  आसपास रोजच्या वापराच्या वस्तू खरेदी करतात किंवा सणासुदीच्या ऑफर शोधत असतात.
 
🔹 Service Provider – म्हणजे Salon, Tiffin Service, प्लंबिग, ज्योतिष, Cleaning Service असा सेवा
यांचे ग्राहक आपली सोय आणि विश्वासाने खात्रीची सेवा मिळेल यावर भर देतात. यात convenience आणि विश्वास हा महत्वाचा फॅक्टर ठरतो.
 
🔹 Manufacturer / Trader – ज्यांचे ग्राहक …. छोटे रिटेलर किंवा B2B क्लायंट असतात,
ज्यांना bulk orders आणि consistency महत्त्वाची असते.
 
🔹  Coaching / Consultant –जसे की Designer, Trainer, किंवा Business Coach —
ज्यांना आपल्या व्यवसायात, skill सेट मध्ये अपग्रेड व्हायचे आहे. अस लोक त्यांचे ग्राहक असतात. समजा एखाद्या डिस्ट्रिब्युटरला आपल्या वेगवेगळ्या ब्रान्चेस मधील मालाचे ट्रॅकींग ठेवायचं असेल. रोज स्टॉक मेन्टेन करायचा असेल तर तो नक्कीच एखादी ॲप किंवा ॲटोमेशन सिस्टिम सेट करून घेईल. App developer  कडे जाऊन त्याची गरज सांगून सिस्टिम डेव्हलप करून घेईल. कोणाला डॉक्टर बनायचे असेल तर तो चांगल्या कोचिंग क्लासमधून एन्स्टान्स एक्झामची तयारी करेल.
 
म्हणूनच बिझनेस ग्रो करण्यासाठी स्वतःला  प्रश्न विचारा —
🟢 माझे ग्राहक कोण आहेत, त्यांचे वय काय, ते कुठून माझ्याकडे येणार आहे, त्यांच्या आवडी काय आहेत?
🟢 ते कोणती समस्या सोडवायला माझ्याकडे येतात?
🟢 आणि मी त्यांच्या भाषेत बोलतो का?
 
लक्षात ठेवा — जेव्हा तुम्ही ग्राहकाच्या भाषेत बोलता,
तेव्हा तुमचं Marketing फक्त Promotion राहत नाही,
ते संवाद बनतो

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top